E-commerce Store
रात्री ११ वाजता तुमचं WhatsApp बंद असतं. दुकान उघडं असू शकतं.
तुमचा ग्राहक रात्री फोन हातात घेतो तेव्हा तुम्ही झोपेत असता. ऑनलाइन स्टोअर तेव्हाही उघडं असतं — प्रॉडक्ट, दर, फोटो, ऑर्डर आणि पेमेंट, तुम्हाला उठवल्याशिवाय. सकाळी उठून तुम्ही फक्त पाठवायचं.
from ₹1,50,000 + GST
डेमो
E-COMMERCE STORE
Teen raaste
Marketplace, WhatsApp, ya apni dukaan.
MARKETPLACE
Commission har order parAur grahak unka ban jaata hai, aapka nahi. Kal woh kisi aur ko upar dikha denge.
SIRF WHATSAPP
Har baat aapko karni padti haiRate ki photo bees baar, order ka hisaab yaad se, aur raat ko dukaan band.
APNI STORE
Grahak bhi aapka, margin bhiCatalogue khud jawab deta hai, order ek jagah aata hai, aur WhatsApp phir bhi khula rehta hai.
Saaf baat
Daam aur delivery par unse ladna namumkin hai, aur hum uske paise nahi lenge. Aapki store un logon ke liye hai jo aapko jaante hain.
Bharat mein log poochh ke kharidte hain. Store bees sawaalon ko hataati hai, baat-cheet ko nahi.
Gateway aapke naam par. Hum kabhi aapke aur aapke paise ke beech mein nahi aate.
Panel aur training aapko milti hai. Rate badalne ke liye agency ka intezaar karna hi dukaan ko purana kar deta hai.
Saath mein yeh bhi chalta hai
Store chalu hai, par poochhne wale abhi bhi message karenge.
Baat karo → NFC CardDukaan ke counter par tap — catalogue unke phone mein.
₹999 → Ads ManagementStore ban gayi. Ab usme log bhi aane chahiye.
Baat karo →Shopify ya apna build — teen saal ka kharcha dono ka dikha kar, phir aap chuno
ही गोष्ट ओळखीची वाटते?
- "याचा दर काय?" — हाच प्रश्न दिवसातून चाळीस वेळा, आणि प्रत्येक वेळी तुम्ही टाइप करता.
- ऑर्डर WhatsApp च्या मेसेजमध्ये अडकतात. कुणी काय मागवलं, पैसे आले का, पाठवलं का — कुठेच नोंद नाही.
- रात्रीचा ग्राहक सकाळपर्यंत थांबत नाही. तो Amazon किंवा दुसऱ्या दुकानाकडे जातो.
- फोटो पाठवा, दर सांगा, स्टॉक तपासा, पत्ता विचारा, पेमेंट मागा — एका ऑर्डरसाठी वीस मेसेज.
हे तुमच्यासाठी आहे, जर
- तुमच्याकडे बऱ्याच वस्तू आहेत आणि प्रत्येकाचा दर WhatsApp वर टाइप करून सांगावा लागतो.
- ऑर्डर WhatsApp वर येतात आणि मेसेजमध्ये हरवतात — कुणी काय मागवलं हे शोधावं लागतं.
- ग्राहक रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी विचारतो आणि तुम्ही उत्तर द्यायच्या आत तो निघून जातो.
- तुम्हाला नाशिकबाहेरही विकायचं आहे, फक्त दुकानात येणाऱ्यालाच नाही.
हे तुमच्यासाठी नाही, जर
- तुमच्याकडे दोन-चार वस्तू आहेत आणि प्रत्येक ऑर्डर बोलून ठरते. मग WhatsApp Automation पुरे, स्टोअर नको.
- तुम्ही सेवा विकता, वस्तू नाही. मग वेगळं काम लागेल — 72-Hour Website बघा.
काम कसं होतं
- 1
प्रॉडक्ट आणि दर घेतो
यादी, फोटो आणि दर तुमच्याकडून. फोटो नसतील तर काय हवं ते सांगतो, आणि त्यामुळे काम थांबत नाही.
- 2
स्टोअर उभं करतो
प्रॉडक्ट, वर्ग, शोध, स्टॉक, delivery चा दर आणि पेमेंट — मोबाइलसाठी आधी बनवलेलं.
- 3
पेमेंट आणि delivery जोडतो
UPI, कार्ड, आणि हवं असल्यास cash on delivery. पैसे थेट तुमच्या खात्यात, आमच्यातून जात नाहीत.
- 4
तुम्हाला चालवायला शिकवतो
नवीन प्रॉडक्ट टाकणं, दर बदलणं, ऑर्डर बघणं — तुम्ही स्वतः करता. प्रत्येक बदलासाठी आमच्याकडे यावं लागत नाही.
हातात काय येईल
- पूर्ण ऑनलाइन स्टोअर — प्रॉडक्ट, वर्ग, शोध, स्टॉक, दर, delivery चा हिशोब.
- मोबाइलसाठी आधी बनवलेलं. भारतात दहापैकी नऊ ऑर्डर मोबाइलवरूनच येते.
- पेमेंट जोडलेलं — UPI, कार्ड, नेट बँकिंग, आणि हवं तर cash on delivery.
- ऑर्डरची नोंद: कुणी, काय, कधी, पैसे आले का, पाठवलं का — एका जागी.
- प्रत्येक ऑर्डरचा अलर्ट थेट तुमच्या WhatsApp वर.
- तुम्ही स्वतः चालवायला शिकता — प्रॉडक्ट टाकणं, दर बदलणं, स्टॉक बदलणं.
- डोमेन, स्टोअर, डेटा आणि पेमेंट अकाउंट सगळं तुमच्या नावावर.
WhatsApp वरून विकणं आणि स्टोअर
Waqt par, warna FREE.
स्टोअर कधी लाइव्ह होणार ही तारीख पैसे घेण्याआधी लिहून दिली जाते. ती चुकली तर पैसे नाहीत. किती ऑर्डर येतील याची हमी आम्ही देणार नाही — ती कुणाच्याच ताब्यात नाही.
ग्राहक स्वतः बघतो, स्वतः निवडतो, स्वतः पैसे भरतो.
- रात्रीचा, सुट्टीचा आणि सणाचा ग्राहक आता हातून जात नाही.
- "दर काय?" हा प्रश्न संपतो — ग्राहक स्वतः बघतो आणि स्वतः ठरवतो.
- पैसे ऑर्डरसोबतच येतात, मागावे लागत नाहीत आणि आठवण करून द्यावी लागत नाही.
- नाशिकबाहेरचा ग्राहकही घेता येतो — दुकानात येणाऱ्यापुरतं मर्यादित राहत नाही.
- काय विकलं, काय उरलं, कोणतं प्रॉडक्ट चालतंय — पहिल्यांदाच आकड्यात दिसतं.
- ग्राहक तुमचा राहतो. Amazon वर तो त्यांचा ग्राहक असतो, तुमचा नाही.
- ऑर्डर वाढल्या तरी माणूस वाढवावा लागत नाही.
तुमचे प्रश्न
Amazon किंवा Flipkart वर विकण्यापेक्षा हे बरं का?
तिथे ग्राहक त्यांचा असतो, तुमचा नाही — त्याचा नंबर, त्याचा ईमेल, काहीच तुम्हाला मिळत नाही. कमिशनही मोठं असतं आणि दर त्यांच्या नियमांनी ठरतात. स्वतःच्या स्टोअरमध्ये कमिशन नाही, ग्राहक तुमचा, आणि नियमही तुमचे. दोन्ही एकत्रही करता येतं.
पेमेंट माझ्या खात्यात येईल का?
हो, थेट. Razorpay किंवा तत्सम gateway तुमच्या नावावर जोडलं जातं. पैसे आमच्यातून जात नाहीत आणि आम्ही त्यावर कमिशन घेत नाही.
नवीन प्रॉडक्ट किंवा दर मलाच बदलता येईल का?
हो, आणि तेच शिकवतो. प्रॉडक्ट टाकणं, दर बदलणं, स्टॉक बदलणं — तुम्ही स्वतः करता. प्रत्येक छोट्या बदलासाठी आमच्याकडे यावं लागत नाही.
माझ्याकडे प्रॉडक्टचे फोटो नाहीत, मग?
कोणते फोटो कसे हवेत ते सांगतो — बहुतेक वेळा चांगल्या फोनवरही चालतात. काही नसतील तर पर्याय काढतो, पण फोटोंशिवाय स्टोअर चालत नाही हे प्रामाणिकपणे सांगतो.
delivery कोण करणार?
ते तुमचंच राहतं — तुमचा माणूस, कुरिअर किंवा स्थानिक delivery. स्टोअर त्याचा दर मोजतो आणि ऑर्डरची नोंद ठेवतो. delivery service जोडायची असेल तर तेही करून देतो.
किती खर्च येईल?
प्रॉडक्टची संख्या आणि काय-काय लागेल यावर ठरतं. WhatsApp वर सांगा — तुमच्या यादीवरून खरे आकडे देतो, अंदाज नाही.
आज रात्री कुणीतरी विचारेल. दुकान उघडं असेल का?
तुमचा ग्राहक रात्री अकरा वाजता फोन हातात घेतो. त्या क्षणी तुमचं WhatsApp बंद असतं आणि दुसरं कुणीतरी उघडं असतं. तो तिथून घेतो. हे तेवढंच बदलतं.
from ₹1,50,000 + GST