Content Marketing

AI उत्तर देतं. पण ते उत्तर कुणाच्या मजकुरातून बनलंय?

तुमचा ग्राहक आता Google वर शोधत नाही, ChatGPT ला विचारतो. आणि ते उत्तर वेबवर जे लिहिलं गेलंय त्यातूनच बनतं. जर तुमच्या धंद्याबद्दल कुठेच काही लिहिलेलं नसेल, तर उत्तरात दुसऱ्याचं नाव येतं — दर वेळी.

from ₹15,000/mo + GST

डेमो

CONTENT MARKETING

?
ChatGPTJAWAB DE RAHA HAI
JAWAB KAHAN SE UTHAYA

 

Ads banaam content

Ek kiraya hai. Doosra sampatti.

ADS

Paisa band, grahak band

Jis din kharch rukta hai, usi din enquiry rukti hai. Kuch bachta nahi.

6 mahine — kharch rukne ke baad

CONTENT

Ek baar likha, saalon chalta hai

Har jawab jo aapke naam se likha gaya, woh saalon tak grahak laata rehta hai — bina kisi click ke paise.

6 mahine — likhne ke baad

Kaise hota hai

Aapki jaankari, aapke naam se likhi hui.

1
Aap bolte ho, hum likhte hain

Mahine mein lagbhag ek ghanta. Gaadi chalate hue voice note bhi chalega — jaankari aapke paas hai, likhna hamara kaam hai.

2
Wahi sawaal jo grahak sach mein poochhte hain

Jo aap roz phone par sunte ho, aur jo log Google aur AI se poochhte hain. Keyword ki list nahi.

3
Aise likha jaata hai ki AI use uthaa sake

Jawab sabse upar, saaf dhaancha, sahi schema. Yahi wajah hai ki AI aapko cite karta hai kisi aur ko nahi.

4
Aapki apni site par, aapke naam

Alag hue toh sab kuch aapke paas rehta hai. Kuch bandhak nahi.

Saaf baat

Yeh dheema hai

Teen se chhe mahine. Agar is hafte grahak chahiye toh ads chalao — aur yeh neeche saath-saath banne do.

AI se likha hua bhara nahi

Wahi cheez aaj Google aur AI dono chhod dete hain. Jaankari aapki, likhaai insaan ki. Agar bina aapse baat kiye likha ja sakta hai, toh woh chhapne layak nahi.

Hamesha nahi likhna padta

Bees-tees achhe jawab ek neev bana dete hain. Us mod par hum khud bolenge — mahine ka bill khinchne ke bajaye.

Aapka waqt — mahine mein ek ghanta

Bas bolna hai. Baaki sab hum karte hain.

Saath mein yeh bhi chalta hai

Aapka waqt: mahine mein ek ghanta · sab kuch aapki site par, aapke naam

ही गोष्ट ओळखीची वाटते?

  • प्रत्येक ग्राहकाला तुम्ही तेच स्पष्टीकरण देता — फोनवर, दुकानात, WhatsApp वर. आणि ते कुठेच लिहिलेलं नाही.
  • स्पर्धकाचा ब्लॉग Google वर वर येतो आणि तुमच्याकडे लिहायला कुणीच नाही.
  • ग्राहक ChatGPT ला विचारतो, तीन नावं मिळतात, आणि त्यात तुमचं नसतं.
  • जो कालच सुरू झाला त्याच्याकडे वीस लेख आहेत आणि अठरा वर्षांचा अनुभव असलेल्या तुमच्याकडे एकही नाही.

हे तुमच्यासाठी आहे, जर

  • तुमच्या धंद्यात ग्राहक विचारून-समजून घेऊन खरेदी करतो, उचलून नाही.
  • तेच तेच प्रश्न प्रत्येक ग्राहक विचारतो आणि तुम्ही तेच उत्तर पुन्हा-पुन्हा सांगता.
  • तुम्हाला माहिती आहे, अनुभव आहे — पण ते कुठेच लिहिलेलं नाही.
  • सहा महिने उभं करायची तयारी आहे, या आठवड्याचा ग्राहक नाही.

हे तुमच्यासाठी नाही, जर

  • तुम्हाला याच आठवड्यात ग्राहक हवा आहे. मग जाहिराती चालवा, हे नंतर.
  • तुम्ही एकच वस्तू विकता आणि ग्राहकाला काहीच समजून घ्यायचं नसतं. मग यात पैसे घालू नका.

काम कसं होतं

  1. 1

    प्रश्न गोळा करतो

    ग्राहक खरोखर काय विचारतात — फोनवर, WhatsApp वर, दुकानात. आणि लोक Google व AI मध्ये काय शोधतात.

  2. 2

    तुमच्याकडून ऐकतो

    व्हॉइस नोट पुरे. अनुभव तुमचा आहे, शब्द आमचे. काल्पनिक काही लिहिलं जात नाही.

  3. 3

    लिहितो आणि रचतो

    ग्राहकाला वाचता येईल असं, आणि Google व AI ला उचलता येईल अशा रचनेत — schema, प्रश्नोत्तरं, स्पष्ट शीर्षकं.

  4. 4

    दर महिन्याला मोजतो

    कोणतं पान वाचलं जातंय, कुठून चौकशी येतेय, आणि AI ने तुमचं नाव घ्यायला सुरुवात केली का.

हातात काय येईल

  • दर महिन्याला ठरलेला मजकूर — लेख, प्रश्नोत्तरं, प्रॉडक्टची माहिती, मार्गदर्शक पानं.
  • मराठी, हिंदी किंवा इंग्रजी — तुमचा ग्राहक ज्या भाषेत वाचतो त्याच भाषेत.
  • AI ला उचलता येईल अशी रचना: schema, स्पष्ट प्रश्नोत्तरं, नीट शीर्षकं.
  • प्रत्येक लेखासोबत सोशल मीडियासाठी छोट्या आवृत्त्या — तोच मजकूर दुप्पट काम करतो.
  • महिन्याचा अहवाल: काय वाचलं गेलं, कुठून चौकशी आली, AI च्या उत्तरात बदल झाला का.
  • सगळा मजकूर तुमच्या नावावर आणि तुमच्या ताब्यात, कायमचा.

नेहमीचा कंटेंट आणि हा

AI ने लिहिलेला, कुणीही लिहू शकेल असा
तुमच्या अनुभवातून, तुमच्या उदाहरणांसह
फक्त Google साठी लिहिलेला
Google आणि AI असिस्टंट दोघांसाठी रचलेला
कीवर्ड कोंबलेले, वाचायला कंटाळवाणा
ग्राहकाच्या खऱ्या प्रश्नांची उत्तरं
दर महिन्याला संख्या मोजली जाते
दर महिन्याला काय वाचलं गेलं ते मोजलं जातं
एजन्सीच्या अकाउंटवर प्रकाशित
तुमच्या साइटवर, तुमच्या नावावर

Waqt par, warna FREE.

दर महिन्याचा मजकूर आणि अहवाल — दोन्हीच्या तारखा महिना सुरू होण्याआधी ठरतात. चुकल्या तर ते काम फ्री. Google वर कितवा नंबर येईल किंवा AI तुमचं नाव घेईलच याची हमी आम्ही देणार नाही — काम, तारीख आणि प्रामाणिक आकड्यांची देतो.

तुमचं ज्ञान लिहिलं जातं — ग्राहकासाठी आणि उत्तर देणाऱ्या मशीनसाठी.

  • जो मजकूर एकदा लिहिला जातो तो वर्षानुवर्षं काम करतो — जाहिरात बंद केली की थांबते, हे थांबत नाही.
  • ग्राहक येण्याआधीच त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात, त्यामुळे बोलणी सोपी होते.
  • AI च्या उत्तरात नाव यायला लागतं — कारण त्या उत्तरात जाण्यासाठी आधी कुठेतरी लिहिलेलं असावं लागतं.
  • तुमचं वर्षांचं ज्ञान डोक्यातून बाहेर येऊन धंद्याची मालमत्ता बनतं.
  • तेच तेच स्पष्टीकरण दिवसातून दहा वेळा द्यावं लागत नाही — लिंक पाठवा, पुरे.
  • सगळा मजकूर तुमच्या साइटवर, तुमच्या नावावर. उद्या आम्हाला सोडलंत तरी तो तुमचाच.

तुमचे प्रश्न

AI नंच लिहून घेतलं तर? फुकट मिळतं ना.

मिळतं, आणि तसा मजकूर लगेच ओळखू येतो — तो कुणाबद्दलच नसतो. तुमची उदाहरणं, तुमचे आकडे, तुमच्या शहरातले प्रसंग AI कडे नाहीत. आणि नेमकं तेच वाचणाऱ्याला आणि उत्तर बनवणाऱ्या मशीनलाही वेगळं वाटतं.

AI च्या उत्तरात नाव यायला किती वेळ लागतो?

काही वेळा Google पेक्षा लवकर, कारण असिस्टंट नवीन मजकूर पटकन उचलतात. पण नियमितपणा लागतो — एक-दोन लेखांनी काही होत नाही. तीन ते सहा महिने हा प्रामाणिक अंदाज आहे.

मला काही लिहावं लागेल का?

नाही. व्हॉइस नोट पुरे — तुम्ही बोला, आम्ही लिहितो. महिन्यातून एक तासही पुरतो.

किती मजकूर दर महिन्याला?

धंदा आणि स्पर्धेवर ठरतं. संख्या ठरवण्याआधी काय लिहायचं आहे ते ठरवतो — दहा वाईट लेखांपेक्षा चार चांगले जास्त काम करतात. WhatsApp वर सांगा, आकडे देतो.

SEO सोबत घेतलं पाहिजे का?

दोन्ही एकत्र चांगलं चालतं, पण सक्ती नाही. साइटचा तांत्रिक पाया आधीच नीट असेल तर फक्त मजकूर पुरतो. नसेल तर आम्ही तेच सुरुवातीला सांगू — तुटलेल्या साइटवर मजकूर म्हणजे खड्ड्यात पैसे.

मराठीत लिहिलं तर उपयोग होईल का?

तुमचा ग्राहक मराठीत शोधत असेल तर नक्कीच — आणि नाशिकसारख्या ठिकाणी बरेच शोधतात. भाषा ग्राहकावरून ठरते, आमच्या सोयीवरून नाही.

उत्तर तर दिलं जाईलच. फक्त कुणाचं नाव त्यात असेल?

आज कुणीतरी तुमच्याच धंद्याबद्दल AI ला प्रश्न विचारेल आणि उत्तर मिळेल. ते उत्तर वेबवर लिहिलेल्या मजकुरातून बनेल. तुमच्याबद्दल कुठेच काही लिहिलेलं नसेल, तर त्यात तुमचं नाव कसं येईल.

from ₹15,000/mo + GST