AI Voice Agent
अकरा कॉल आले. सात कुणी उचललेच नाहीत.
तुमचा फोन उचलला जात नाही तेव्हा तो कॉल हरवतो. Voice agent प्रत्येक कॉल उचलतो — पहिल्या रिंगमध्ये, दिवसा-रात्री, तुम्ही कामात असताना. दर, वेळ, पत्ता, उपलब्धता सांगतो, नाव आणि नंबर घेतो, आणि महत्त्वाचं असेल तर लगेच तुम्हाला कळवतो.
Custom quote
डेमो
AAPKE WHATSAPP PAR — call khatam hote hi
AUR YEH KABHI NAHI KAREGA
Jo woh bol de woh aapka vaada ban jaata hai. Isliye range batata hai, pakka number nahi — aur kehta hai “yeh sir khud batayenge”.
Shuru mein hi kehta hai ki woh business ka assistant hai. Log tez madad maaf kar dete hain; dhokha nahi.
Hindi, Marathi, English — aur beech mein badal jaaye toh bhi saath chalta hai. Buzurg grahak English menu mein nahi khota.
Bahar se number utha ke thok-thok call karna Bharat mein kanoon ke khilaaf hai, aur hum karte bhi nahi. Yeh sirf unhe call karta hai jinhone khud aapse baat ki ho — form bhara ho, enquiry ki ho, ya pehle se grahak hon.
Aapke hi number par baithta hai. Jab aap na utha sako tab, ya band ke baad — aap tay karo, kabhi bhi badal do.
ही गोष्ट ओळखीची वाटते?
- फोन वाजतो तेव्हा तुम्ही दुसऱ्या ग्राहकासोबत असता. दोघांपैकी एक जातोच.
- कॉल न उचलला गेला की ग्राहक परत फोन करत नाही — तो यादीतल्या पुढच्या नावाला करतो.
- "किती वाजेपर्यंत उघडं आहे?" या प्रश्नासाठी तुम्ही दिवसातून दहा वेळा फोन उचलता.
- दुकान बंद झाल्यावरचे कॉल कुठेच नोंदले जात नाहीत. किती गेले हे तुम्हाला कधी कळणारच नाही.
हे तुमच्यासाठी आहे, जर
- तुमचा फोन दिवसभर वाजतो आणि अर्धे कॉल उचलले जात नाहीत.
- तुम्ही कामात असता — दुकानात, गाडीत, ग्राहकासोबत — आणि तेव्हाच फोन येतो.
- तेच तेच प्रश्न फोनवर विचारले जातात: उघडं आहे का, दर काय, कुठे आहात.
- दुकान बंद झाल्यावर आलेला कॉल पूर्णपणे वाया जातो.
हे तुमच्यासाठी नाही, जर
- तुमच्याकडे दिवसाला दोन-चार कॉल येतात. एवढ्यासाठी हे नको.
- तुमच्या धंद्यात प्रत्येक कॉल लांब आणि गुंतागुंतीचा असतो. मग माणूसच हवा — आणि आम्ही तेच सांगू.
काम कसं होतं
- 1
तुमचे नेहमीचे कॉल समजून घेतो
लोक फोनवर खरोखर काय विचारतात — दर, वेळ, पत्ता, उपलब्धता, अपॉइंटमेंट. अंदाजानं नाही.
- 2
उत्तरं आणि आवाज ठरवतो
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी. आवाज कसा हवा हे तुम्ही ऐकून ठरवता, आणि प्रत्येक उत्तर मंजूर करता.
- 3
कुठे थांबायचं ते ठरवतो
माहिती देणं agent करेल. सवलत, तक्रार, मोठी ऑर्डर, गुंतागुंतीचा प्रश्न — नाव-नंबर घेऊन लगेच तुम्हाला अलर्ट.
- 4
चालू करून ऐकत राहतो
पहिला आठवडा प्रत्येक कॉल आम्ही स्वतः ऐकतो. उत्तर कमी पडलं तिथे लगेच सुधारतो.
हातात काय येईल
- प्रत्येक कॉल पहिल्या रिंगमध्ये उचलला जातो — दिवसा, रात्री, सुट्टीच्या दिवशीही.
- तुमच्या मंजुरीनं ठरलेली उत्तरं, तीन भाषांत — मराठी, हिंदी, इंग्रजी.
- प्रत्येक कॉलची नोंद: कोण, कधी, काय विचारलं, नंबर काय.
- महत्त्वाचा कॉल आला की लगेच WhatsApp वर अलर्ट, नाव आणि नंबरसह.
- एकाच वेळी अनेक कॉल — दहा लोकांनी एकदम फोन केला तरी कुणालाच busy लागत नाही.
- महिन्याचा अहवाल: किती कॉल आले, किती उत्तरं agent नं दिली, किती तुमच्यापर्यंत आले.
आजची पद्धत आणि ही
Waqt par, warna FREE.
सुरू करण्याची तारीख पैसे घेण्याआधी ठरते. ती चुकली तर पैसे नाहीत. आणि पहिला आठवडा प्रत्येक कॉल आम्ही स्वतः ऐकतो — चालू करून सोडून देत नाही.
प्रत्येक कॉल उचलला जातो. एकही चौकशी हरवत नाही.
- उचलला न गेलेला कॉल म्हणजे गेलेला ग्राहक. तो गळतीचा मार्ग बंद होतो.
- तुम्ही ग्राहकासोबत असताना फोन वाजल्याचं ओझं संपतं — दोघांपैकी एकही जात नाही.
- दुकान बंद असतानाही चौकशी नोंदली जाते, आणि सकाळी नाव-नंबर तयार असतो.
- सणासुदीला किंवा जाहिरात चालू असताना कॉल तिप्पट झाले तरी काहीच बदलत नाही.
- किती कॉल येतात हे पहिल्यांदाच आकड्यात दिसतं.
- नंबर तुमचाच, नोंदी तुमच्याच, डेटा तुमचाच.
तुमचे प्रश्न
आवाज यंत्रासारखा वाटेल का?
काम सुरू करण्याआधी तुम्ही आवाज ऐकून ठरवता. आम्ही तो माणसासारखा भासवायचा प्रयत्न करत नाही — उत्तर स्पष्ट, छोटं आणि उपयोगी असतं, आणि गरज पडली की लगेच तुमच्याकडे सोपवलं जातं.
मराठीत बोललं तर समजेल का?
हो. मराठी, हिंदी आणि इंग्रजी. ग्राहक ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत उत्तर.
माझा नंबर बदलावा लागेल का?
नाही. तुमच्याच नंबरवर चालतं. तुम्ही उचलला नाहीत तरच agent उचलतो — किंवा तुम्ही सांगाल तसं ठरवता येतं.
गुंतागुंतीचा प्रश्न आला तर?
agent ठरलेल्या गोष्टीच सांगतो. बाहेरचं काही आलं की नाव-नंबर घेतो आणि लगेच तुम्हाला WhatsApp वर अलर्ट पाठवतो. अंदाजानं उत्तर देत नाही.
मी मध्ये येऊन स्वतः बोलू शकतो का?
हो. तुम्ही उपलब्ध असाल तेव्हा कॉल तुमच्याकडेच जाईल असं ठरवता येतं. agent फक्त तुम्ही नसाल तेव्हाच उचलतो.
किती खर्च येईल?
किती कॉल येतात आणि किती प्रकारची उत्तरं लागतील यावर ठरतं. कॉलच्या मिनिटांचा स्वतःचा दर वेगळा असतो आणि तो तुमच्या नावावर राहतो. WhatsApp वर सांगा, आकडे बोलण्याआधीच देतो.
आज किती कॉल हरवले? तुम्हाला माहीतच नाही.
उचलला न गेलेला कॉल कुठेच नोंदला जात नाही. तो ग्राहक परत फोन करत नाही — तो पुढच्या नावाला करतो. हे तेवढंच बदलतं, आणि पहिल्या महिन्यातच आकडा दिसतो.
Custom quote