Google / Meta Ads Management
एकच ₹30,000. दोन वेगळे निकाल.
Boost बटण दाबलं की पैसे खर्च होतात आणि likes येतात. तेच पैसे नीट चालवले तर चौकशी येते. फरक बजेटमध्ये नाही — कुणाला दाखवलं, काय दाखवलं आणि नंतर काय मोजलं, यात आहे.
from ₹20,000/mo (ad spend separate) + GST
डेमो
JO HUM VAADA NAHI KARENGE
Jo aisa vaada kare usse dhyan se milna. Hum campaign, targeting aur likhaai sambhalte hain. Aapke pratispardhi, aapke rate aur bazaar hamare haath mein nahi.
Budget seedha Google/Meta ko jaata hai, aapke apne account se. Hamari fee alag hai. Aap hamesha dekh sakte ho kitna kharch hua.
Aapke naam par bane, aapke access ke saath. Kabhi alag hue toh account, itihaas aur poora data aapke paas rehta hai.
Agar ginti kehti hai ki ads aapke liye faayde ka sauda nahi, hum wahi bolenge — mahine ki fee lene ke bajaye.
ही गोष्ट ओळखीची वाटते?
- boost केलं, ₹30,000 गेले, ३०० likes आले आणि एकही फोन नाही.
- जाहिरात कुणाला दिसते हे तुम्ही कधीच ठरवलं नाही — Facebook नं ठरवलं, आणि त्याला तुमचा धंदा माहीत नाही.
- किती खर्चातून किती चौकशी आली हा आकडा कुणाकडेच नाही.
- एजन्सीचा रिपोर्ट reach आणि impressions नं भरलेला असतो, आणि त्यातलं एकही तुमच्या बँकेत जमा होत नाही.
हे तुमच्यासाठी आहे, जर
- तुम्ही boost करता, पैसे जातात, likes येतात आणि फोन येत नाही.
- जाहिरातींवर दर महिन्याला खर्च होतो आणि त्यातून किती धंदा आला हे सांगता येत नाही.
- स्पर्धकाच्या जाहिराती सारख्या दिसतात आणि तुमच्या कुठेच दिसत नाहीत.
- तुम्हाला या आठवड्यात ग्राहक हवा आहे, सहा महिन्यांनी नाही.
हे तुमच्यासाठी नाही, जर
- तुमची वेबसाइट किंवा WhatsApp अजून तयार नाही. आधी ते — तुटलेल्या ठिकाणी लोक पाठवणं म्हणजे पैसे खड्ड्यात.
- तुम्हाला जाहिरातींशिवाय कायमचा ग्राहक हवा आहे. मग SEO + AI Visibility बघा — पण तिथे सहा महिने लागतात.
काम कसं होतं
- 1
ग्राहक कोण आहे ते ठरवतो
वय, ठिकाण, आवड, आधी काय शोधलंय — जिथे तुमचा खरा ग्राहक आहे तिथेच पैसे जातात, सगळीकडे नाही.
- 2
जाहिरात बनवतो आणि तपासतो
एकच नाही, तीन-चार आवृत्त्या. कोणती चालते हे अंदाजानं नाही, आकड्यानं ठरतं.
- 3
चौकशी कुठे येईल ते नीट लावतो
WhatsApp, फोन किंवा फॉर्म — आणि ती जागा जाहिरात सुरू होण्याआधी तयार असते.
- 4
दर आठवड्याला सुधारतो
जे चालत नाही ते बंद, जे चालतं त्यात जास्त. आणि रिपोर्टची सुरुवात चौकशीच्या आकड्यानं होते.
हातात काय येईल
- Google आणि Meta दोन्हीवर जाहिराती — तुमच्या धंद्याला जिथे उपयोग आहे तिथेच.
- जाहिरातीचं डिझाइन आणि मजकूर, तुमच्या भाषेत — मराठी, हिंदी किंवा इंग्रजी.
- ग्राहक नेमका कोण, हे ठरवून लावलेलं targeting — boost सारखं सगळ्यांना नाही.
- चौकशी येण्याची जागा नीट लावलेली: WhatsApp, कॉल किंवा फॉर्म, आणि प्रत्येकाची नोंद.
- दर आठवड्याला सुधारणा — जे चालत नाही ते लगेच बंद.
- महिन्याचा अहवाल जो चौकशीपासून सुरू होतो: किती खर्च, किती चौकशी, प्रत्येक चौकशीमागे किती रुपये.
Boost बटण आणि चालवलेली जाहिरात
Waqt par, warna FREE.
जाहिरात कधी सुरू होणार आणि रिपोर्ट कधी मिळणार — दोन्ही तारखा पैसे घेण्याआधी ठरतात. चुकल्या तर ते काम फ्री. किती चौकशी येईल याची हमी आम्ही कधीच देणार नाही, कारण ती कुणाच्याच ताब्यात नाही. आम्ही काम, तारीख आणि प्रामाणिक आकड्यांची हमी देतो.
तेच पैसे. फक्त योग्य माणसाला, योग्य गोष्ट दाखवून, आणि नंतर मोजून.
- याच आठवड्यात ग्राहक — SEO सारखे सहा महिने वाट बघावी लागत नाही.
- पैसे तुमच्या खऱ्या ग्राहकावर खर्च होतात, सगळ्यांवर नाही.
- प्रत्येक चौकशीमागे किती रुपये गेले हा आकडा पहिल्यांदाच दिसतो.
- जे चालत नाही ते महिनाभर चालू राहत नाही — आठवड्यातच बंद.
- जाहिरात बंद केली तरी शिकलेलं राहतं: कोण खरेदी करतं, कोणता मजकूर चालतो.
- ad अकाउंट, pixel आणि डेटा तुमच्या नावावर. उद्या दुसऱ्याकडे गेलात तरी सगळं तुमच्याकडेच.
तुमचे प्रश्न
जाहिरातीचं बजेट यात येतं का?
नाही. Google आणि Meta ला जाणारे पैसे तुमच्या नावावर, तुमच्या कार्डवरून थेट जातात — आम्ही त्यावर कमिशन घेत नाही. आमचं शुल्क वेगळं, ते चालवण्याचं.
किती बजेट लागेल?
धंदा, शहर आणि स्पर्धा यावर ठरतं. सुरुवातीला छोटं ठेवून आकडे बघणं आम्हाला बरं वाटतं — मग कुठे काम होतंय ते कळल्यावर वाढवता येतं. WhatsApp वर सांगा, खरे आकडे देतो.
किती चौकशी येतील याची हमी देता का?
नाही. जो देतो तो आकडा नंतर बदलतो. पहिल्या महिन्यानंतर मात्र तुमचा स्वतःचा खरा आकडा तयार होतो — आणि पुढचं नियोजन त्यावर होतं, अंदाजावर नाही.
Google की Facebook — कोणतं चांगलं?
दोन्ही वेगळं काम करतात. लोक जे शोधतच आहेत त्यांच्यासाठी Google, आणि ज्यांना अजून माहीतच नाही त्यांच्यासाठी Meta. तुमच्या धंद्याला काय लागेल ते सुरुवातीलाच सांगतो — दोन्ही घ्यायची गरज नसते.
माझी वेबसाइट नाही, चालेल का?
चौकशी थेट WhatsApp वर आणता येते, त्यामुळे सुरुवात करता येते. पण वेबसाइट असेल तर तेच पैसे जास्त काम करतात — आणि हे आम्ही सुरुवातीलाच सांगू.
किती काळ करावं लागेल?
जाहिरात बंद केली की चौकशी थांबते — हे खरं आहे आणि आम्ही लपवत नाही. म्हणूनच सोबत SEO चा पाया घालायचा सल्ला देतो, म्हणजे कायमचं जाहिरातींवर अवलंबून राहावं लागत नाही.
पैसे तेच जातात. फरक फक्त नंतर काय येतं यात.
गेल्या महिन्यात तुम्ही boost वर जे खर्च केलं, तेच पैसे योग्य माणसाला दाखवले असते तर फोन वाजला असता. रक्कम बदलायची गरज नाही — फक्त ती कुठे जाते ते बदलायचं आहे.
from ₹20,000/mo (ad spend separate) + GST